• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी: पहिल्यांदाच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिंदे गटाची महायुती ; ठाकरे गट एकाकी..!

Admin by Admin
January 5, 2023
in राजकीय
1 min read
0
मोठी बातमी : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी: पहिल्यांदाच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिंदे गटाची महायुती ; ठाकरे गट एकाकी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विशेष प्रतिनिधी /राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात अडिच वर्ष सत्ताही स्थापन केली.

यापुढेही ही आघाडी कायम ठेवण्याचा निर्धारही या तिन्ही पक्षांनी केला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंतच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णयही झाला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एक अनोखीच महायुती जन्माला आली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला वगळून ही महायुती जन्माला आली आहे.

लांजा तालुक्यात खरेदी विक्री संघाची निवडणूक होत आहे. येत्या 15 जानेवारी रोजी ही निवडणूक होत आहे. 17 जागांसाठी मतदान होत असून एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही एक छोटी निवडणूक असली तरी ती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. खरेदी विक्री संघावर आपला वरचष्मा राहावा म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपली गणितं मांडली असून त्यानुसार काम करत आहेत.

लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र अनोखी युती झालेली पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना होईल अशी अपेक्षा होती. भाजप युती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्रं दिसेल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, अनोख्या महायुतीमुळे केवळ लांज्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लांज्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा गट स्वबळावर लढणार आहे. ठाकरे गटाविरोधात सर्व पक्षीय पॅनल एकवटलं आहे. या पॅनलला सहकार पॅनल असं नाव देण्यात आलं आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ लांजा गावचे ग्रामदैवत श्री देव चव्हाटा तसेच देव केदारलिंग मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.

लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरोधात सर्वपक्षीयांचे सहकार पॅनल उभे ठाकले आहे. एकूण 17 जागांसाठीची ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Previous Post

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त पाटील यांचे काम प्रेरणादायी –  चंद्रशेखर क्षीरसागर

Next Post

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या वसुली प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ द्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या वसुली प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ द्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group