सांगली : शहरातील “साई – भगवान” सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. सांगली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात हा सोहळा पार पडला.
दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष धनाजी कोळपे, भाजप नेते शेखर इनामदार, जिल्हा संघटक दीपक माने, श्रीकांत वाघमोडे, अतुल माने, भोपाल सरगर, दरीबा बंडगर व इतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते.
तसेच प्रशांत कांबळे, शिवाजी खंडागळे,हसन मुजावर अस्लम शेख, अब्दुल पिरजादे, मुजमिल बेग, तोसिफ पठाण, शोएब शेख, साकीब सय्यद इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी “साई – भगवान” सेवाभावी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

