• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात ७०० जणांना विषबाधा…!

Admin by Admin
January 5, 2023
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Aurangabad News: औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं अंदाजे 700 जणांची प्रकृती बिघडली. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल (बुधवारी) लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र याचवेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली. पाहता-पाहता अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 700 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पाहता-पाहता 700 जणांना विषबाधा…

औरंगाबाद शहरात संध्याकाळी कदीर मौलाना यांच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी मोठ्याप्रमाणावर लोकांना आमंत्रण देण्यात आले असल्याने, लग्नात गर्दी देखील मोठी होती. या शाही लग्नात वेगवेगळ्या प्रकारचे पकवान बनवण्यात आले. मात्र जेवणानंतर अनेकांना त्रास सुरु झाला. पाहता पाहता त्रास होणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार 700 लोकांना विषबाधा झाली असल्याचे बोलले जात आहे.

एकच धावपळ!

लग्नसमारंभ सुरु असतानाच जेवणानंतर लोकांना त्रास सुरु झाला. अचानक मोठ्या प्रमाणावर ही संख्या वाढू लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कुणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कुणाला मळमळ होऊ लागली. त्यामुळे या सर्वांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात देखील अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.

कदीर मौलाना समर्थकाची माहिती…

याबाबत कदीर मौलाना यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना त्रास होत होता. मात्र कोणेही गंभीर नाही. तसेच सर्वांना रात्रीची तपासून डॉक्टरांनी तात्काळ सुट्टी दिली आहे. त्यामुळे कोणेही गंभीर नाहीत. तसेच हा सर्व प्रकार कदीर मौलाना यांच्या घरी घडला नसून, जेवणाचा कार्यक्रम मुलीकडे होता. तर कदीर मौलाना यांच्याघरी होणारा कार्यक्रम आज आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे , कदीर मौलाना यांच्या समर्थकाने प्रतिक्रीया दिली आहे.

Previous Post

“साई – भगवान” सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त पाटील यांचे काम प्रेरणादायी –  चंद्रशेखर क्षीरसागर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त पाटील यांचे काम प्रेरणादायी –  चंद्रशेखर क्षीरसागर

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त पाटील यांचे काम प्रेरणादायी -  चंद्रशेखर क्षीरसागर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group