• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

निवासी डॉक्टरांचा संप मागे ; महाजन म्हणाले २ दिवसात भरणार १ हजार ४३२ पदे.

Admin by Admin
January 3, 2023
in मंत्रालय
1 min read
0
निवासी डॉक्टरांचा संप मागे ; महाजन म्हणाले २ दिवसात भरणार १ हजार ४३२ पदे.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Maharashtra Doctors strike update : राज्यातील ७ हजारहून अधिक निवासी डॉक्टर त्यांच्या विविध मागण्यांसाठी (२ जानेवारी २०२३) बेमुदत संपावर गेले होते. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना म्हणजेच मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने संप पुकारला होता.

दरम्यान मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला असून डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (मार्ड) च्या संपावर यशस्वी तोडगा काढण्यात यश आलं असून मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप अखेर मागे घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. सीनियर रेसिडेंट्सचा १४३२ पदांचा प्रश्न होता, दोन ते तीन दिवसांमध्ये ही सगळी पदे भरली जातील असे महाजन म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न देखील सोडवले जातील असं अश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

केंद्र शासनाकडे ५०० कोटींची मागणी करत आहे, सीएसआर कंपन्यांकडे देखील हॉस्टेल बांधण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना निवासाची सोय करून दिली जाईल असेही महाजन म्हणाले. तसेच महापालिकांच्या प्रश्नांबाबत आयुक्तांशी चर्चा केली आहे असेही महाजन म्हणाले. संघटनेसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी संप मागे घतल्याचे देखील ते म्हणाले.

डॉक्टरांच्या काय मागण्या होत्या

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १ हजार ४३२ जागांची पद भरती करावी तसेच शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांमध्ये नवी वसतीगृहं बांधावीत, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदं तातडीनं भरावीत, महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा आणि निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावं अशा मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता.

Previous Post

तहसीलदारांच्या आदेशाला तलाठ्यांकडून केराची टोपली

Next Post

आष्ट्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना; प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटविला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आष्ट्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना; प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटविला

आष्ट्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना; प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटविला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group