• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तहसीलदारांच्या आदेशाला तलाठ्यांकडून केराची टोपली

चार वर्षांपूर्वी केलेले आदेश फक्त दाखवायलाच

Admin by Admin
January 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अवैध गौण खनिज उत्खनन विरोधातील कारवाईला ब्रेक

कडेगाव तालुक्यात तपासणी करून दोषींवर कारवाईची गरज

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील काही तलाठ्यांनी अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सुमारे चार वर्षांपूर्वी पारित केलेले आदेश फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवायलाच केले असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं अवैध गौण खनिज उत्खनन विरोधातील कारवाई का ब्रेक लागल्याचे दिसत असून संबंधित प्रकरणात तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून तपासणी करावी व दोषी तलाठ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी प्रत्येक वेळी प्रतिबंधात्मक पावले उचलत असतात अशीच पावले सुमारे चार वर्षांपूर्वी उचलली होती. यातून गौण खनिज उत्खनन केलेल्या लोकांचे नावे पंचनामे करून खुलासा मागवला होता. त्यानंतर खुलासा मान्य अमान्य होऊन ज्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला त्यांना दंडाच्या नोटिसा देण्यात आल्या. या नोटिसना प्रतिसाद न मिळाल्याने तत्कालीन तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी संबंधित व्यक्तींच्या नावावर असणाऱ्या मिळकतीवर प्रचलित कायद्यानुसार बोजा चढवण्याचे आदेश केले. मात्र त्यातील बरेच आदेश केवळ कागदोपत्री आणि वरिष्ठांना दाखवण्या पुरतेच काढण्यात आले होते की काय ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

देवराष्ट्रे येथील एका प्रकरणात सदर आदेशाचा अंमल न झाल्याने काही ग्रामस्थांनी तत्कालीन तलाठी यांचे विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित तलाठ्याने आदेशाची अंमलबजावणी केली होती. तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात तलाठयांनी कुचराई का केली? याबाबत काडीमात्र चौकशी करण्यात आली नाही. तर आजही असे अनेक आदेश अंमलबजावणी वाचून धूळ खात पडले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाला अशाप्रकारे केराची टोपली दाखवणाऱ्या तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई का केली जात नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विद्यमान तहसीलदार व प्रांताधिकारी धडाडीचे आहेत त्यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी व दोषी तलाठ्यांवर कठोर कारवाई म्हणजे भविष्यात अशा प्रकारे वरिष्ठांच्या आदेशाला कोणीही केराची टोपली दाखवणार नाही अशी मागणी होत आहे.

Previous Post

रात्री खळबळ उडाली : माजी सभापतीवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला

Next Post

निवासी डॉक्टरांचा संप मागे ; महाजन म्हणाले २ दिवसात भरणार १ हजार ४३२ पदे.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
निवासी डॉक्टरांचा संप मागे ; महाजन म्हणाले २ दिवसात भरणार १ हजार ४३२ पदे.

निवासी डॉक्टरांचा संप मागे ; महाजन म्हणाले २ दिवसात भरणार १ हजार ४३२ पदे.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group