• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

चाकूचा धाक दाखवत महिला वकिलाच्या कारवर दरोडा : दोन लाखांचा ऐवज लुटला : चोरट्यांच्या टोळक्याने केली दगडफेक.

Admin by Admin
December 31, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कवठेमहांकाळ खबऱ्या प्रतिनिधी: पंढरपूरला निघालेली कार अडवून, चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एक लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांबरोबर झालेल्या झटापटीत कारमधील माधवी जनार्दन जानकर (वय 25, रा.घाडगे कॉलनी कोल्हापूर) व विकास परशुराम हेगडे (वय 22, रा. कलेक्टर ऑफिस शेजारी कोल्हापूर) हे जखमी झाले. ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावच्या हद्दीत आगळगाव फाट्याजवळ घडली.

याबाबतची माहिती अशी, व्यवसायाने वकील असणार्‍या भाग्यश्री विलास पाटील (वय 28, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्यासह सहाजण कार (एम.एच.04, इ.टी. 8037) ने कोल्हापूरहून पंढरपूरला निघाले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री आगळगाव फाट्याजवळ पाटील यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली असता पाच अज्ञात चोरटे गाडीजवळ आले.

पाटील यांना चाकूचा धाक दाखवत व जीवे मारण्याची धमकी देत गाडीतील रोख रक्कम व महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून घेतले. गाडीतील तीन मोबाईल, स्मार्टवॉच महिलांच्या अंगावरील तीन तोळे सोन्याचे दागिने, 51 हजार 700 रुपयांची रोख रक्कम असे सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

गाडीतील पर्स, त्यातील ए.टी.एम. कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लायसन्स व वकिलाची अन्य कागदपत्रे चोरट्यांनी पळवली. गाडीवर दगडफेक केल्याने नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

एस.टी. वर दगडफेक, मंगळवेढ्याची मुलगी जखमी

दरम्यान, याच अज्ञात चोरट्यांनी मालवणहून मंगळवेढ्याला निघालेल्या सहलीच्या एस.टी. बस ( एम. एच.14, बी. टी.3590) वरही दगडफेक केली. या घटनेत प्रगती दत्तू नवत्रे (वय 13, रा. मंगळवेढा ) ही शाळकरी मुलगी जखमी झाली. बसमधील चालक व शिक्षकांनी प्रसंगावधान राखून गाडी न थांबवता भरधाव वेगाने नेऊन जखमी मुलगीला सांगोला येथे दवाखान्यात दाखल केले. कवठेमहांकाळ एस. टी. आगाराचे आगार व्यवस्थापक महेश जाधव यांनी याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Previous Post

स्टेट बँक शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यावरील २१ लाख रुपये हडपले ; महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Next Post

शालेय मुलींची बस ओढ्यात कोसळली, तीन मुली गंभीर जखमी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शालेय मुलींची बस ओढ्यात कोसळली, तीन मुली गंभीर जखमी.

शालेय मुलींची बस ओढ्यात कोसळली, तीन मुली गंभीर जखमी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group