• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

स्टेट बँक शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यावरील २१ लाख रुपये हडपले ; महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Admin by Admin
December 31, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
स्टेट बँक शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यावरील २१ लाख रुपये हडपले ; महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी: मिरज – पंढरपूर रस्त्यावरील स्टेट बँक शाखेतील मृत खातेदाराच्या खात्यातील 21 लाख 28 हजार 364 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक अनिल साळे व त्याचा सहायक अवधूत पाटील अशा दोघांवर महात्मा गांधी चौकी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सध्याचे बँक व्यवस्थापक मयूर चंद्रशेखर यळमळ्ळी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्टेट बँकेच्या शाखेत रघुवीरकुमार रतन राव हे खातेदार होते. ते 11 मार्च 2018 रोजी मृत झाले. त्यावेळी त्यांच्या एकूण तीन खात्यांमध्ये 21 लाख 28 हजार 364 रुपयांची रक्कम होती. दरम्यान, तत्कालीन व्यवस्थापक साळे आणि त्याचा सहाय्यक कर्मचारी पाटील या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सदर मृत खातेदाराच्या बँक रकमेवरच डल्ला मारला. साळे याच्या अधिकाराखाली पाटील याने मृत राव यांच्या बँक खात्यात शिल्लक असलेली सर्व रक्कम इतर खात्यांवर वर्ग केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी अनिल साळे व अवधूत पाटील या दोघांना अटक केली आहे.

Previous Post

खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी समन्वय साधणार – प्रांत अधिकारी समीर शिंगटे

Next Post

चाकूचा धाक दाखवत महिला वकिलाच्या कारवर दरोडा : दोन लाखांचा ऐवज लुटला : चोरट्यांच्या टोळक्याने केली दगडफेक.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

चाकूचा धाक दाखवत महिला वकिलाच्या कारवर दरोडा : दोन लाखांचा ऐवज लुटला : चोरट्यांच्या टोळक्याने केली दगडफेक.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group