• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आटपाडीतील ख्रिस्ती धर्मांतर प्रकरणी हिंदू समाजाचा “हिंदू धर्म रक्षक मोर्चा..”

Admin by Admin
December 30, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
आटपाडीतील ख्रिस्ती धर्मांतर प्रकरणी हिंदू समाजाचा “हिंदू धर्म रक्षक मोर्चा..”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / आटपाडीमध्ये रूग्णांवर मंत्र-तंत्र करून धर्मांतरण प्रकरणी आणि संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारकारच्या कारभाराची व संपत्तीची चौकशी करा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आटपाडीत हिंदू धर्म रक्षक मोर्चा काढण्यात आला. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत आटपाडी पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते.

धर्मांतर केल्याचा प्रकार : काही दिवसांपूर्वी आटपाडी शहरांमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये एका महिलेवर तंत्र-मंत्र उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अतिदक्षता विभागामध्ये उपचारा सुरू असणाऱ्या महिलेवर ख्रिस्ती धर्मांतरणासाठी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबतचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद देखील झाला होता. या प्रकरणी संपतराव धनवडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये जादूटना प्रकरणाबाबत तक्रार देखील दाखल केली होती.

कारवाईसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा : मात्र हा सर्व प्रकार धर्मांतरणाचा असल्याचा आरोप करत आज आटपाडी मध्ये समस्त सकल हिंदू समाजाच्यावतीने गुन्हा दाखल झालेल्या ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळे व त्यांच्या पत्नीचे सखोल चौकशी करून त्यांच्या कारभाराचे आणि संपत्तीची चौकशी करावी या मागणीसाठी आणि कडक कारवाईसाठी हिंदू धर्म रक्षक मोर्चा काढण्यात आला. आटपाडी पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते.

Previous Post

मानधन तत्वावरील लाचखोर अभियंता मकानदारचे समर्थन करीत सेवेत घेण्यासाठी शिफारस करणाऱ्या “त्या” लाभार्थ्यांना सहआरोपी करा ; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल.

Next Post

जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; "जिल्हा मध्यवर्ती बँकेतील.......!"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group