• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

Admin by Admin
December 30, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरकारभाराच्या चौकशीला असलेली स्थगिती राज्य शासनाने उठवली आहे. कथित गैरव्यवहाराची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे निर्देश सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना शुक्रवारी देण्यात आले आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना शह मानला जात आहे.

इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय व शाखा कार्यालयासाठी फर्निचर खरेदी, एटीएम यंत्र, नोटा मोजण्याचे यंत्र आदी बाबीवर ३० ते ४० कोटींचा खर्च अनावश्यक खर्च केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. तसेच नोकरभरतीवरही प्रश्‍न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते याबाबत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी संचालक असताना चौकशीची मागणी केली होती.

तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनीही सरफेसी कायद्याअंतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, बचत गट, कंपनी यांना देण्यात आलेल्या ६० कोटींच्या कर्जाचे निर्लेखन करणे, संचालकांच्या कारखान्यांस ३२ कोटींचे कर्ज पुरवठा करणे, नूतनीकरणावर ११ कोटींचा खर्च आदी बाबीबाबत तक्रार केली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तथापि, या चौकशी आदेशाल २३ सप्टेंबर २०२१ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती शुक्रवारी उठविण्यात आली असून या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यात यावी असे निर्देश सहका आयुयतांना विशेष कार्य अधिकारी सहनिबंधक व सहकारी संस्था यांनी आज दिले.

या वादग्रस्त कालखंडामध्ये जिल्हा बँकेवर आ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षिय संचालक मंडळच सत्तेवर होते. सध्याही आ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळच सत्तेवर आहे. आ. नाईक यांनी संचालक असताना जिल्हा बँकेतील गैरकारभाराबाबत चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर हे चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

Previous Post

आटपाडीतील ख्रिस्ती धर्मांतर प्रकरणी हिंदू समाजाचा “हिंदू धर्म रक्षक मोर्चा..”

Next Post

खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी समन्वय साधणार – प्रांत अधिकारी समीर शिंगटे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी समन्वय साधणार  – प्रांत अधिकारी समीर शिंगटे

खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी समन्वय साधणार - प्रांत अधिकारी समीर शिंगटे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group