कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / शहरात दिनांक १ ते ३ जानेवारी २०२३ रोजी नव वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने होणार आहे. गजर किर्तनाचा, सोहळा विठ्ठल भक्तांचा.. या प्रमाणे नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी १ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प.प्रकाश साठे महाराज,
दि.२ जानेवारी रोजी ह.भ.प.माऊली महाराज चाळक व कृष्णा महाराज चाळक बंधु यांची किर्तनाची जुगलबंदी
ह.भ.प.शिवलिलाताई पाटील यांचे दि.३ जानेवारी रोजी किर्तन सोहळा अकुज ड्रिमलॅंड क्रिडांगणावर रंगणार आहे.
यासाठी महिला व पुरुष यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असुन, गतवर्षीचा अनुभव पाहता यावेळी हजारो नागरिक या किर्तन सोहळ्याचा आनंद घेणेसाठी कुपवाड नगरीत येतील असा विश्वास मंडळाच्या पदाधिकार्यांना आहे. या किर्तन सोहळ्याचे नुकतेच जाहिरात प्रकाशन सोहळा व कमान व व्यासपिठ उभारणी कामाचा शुभारंभ गावातील जेष्ठ नागरिक व श्री. ग्रंथराज पारायण सोहळा समिती सदस्याच्या उपस्थित झाला.
यावेळी नगरसेवक गजानन मगदुम, मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील,कुपवाड सोसायटीचे संचालक दादासो पाटील, विजयदादा खोत, शिवगोंडा पाटील बनाटे, बाळासाहेब पाटील, गंगाधर पाटील, राजेंद्र पाटील (रुमाले), अविनाश पाटील मंडळाचे पदाधिकारी व पारायण समितीचे सदस्य उपस्थित होते.

