• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Admin by Admin
December 30, 2022
in क्राईम, मंत्रालय, सामाजिक
1 min read
0
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी जय्यत तयारी केली असताना शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या मदतीला वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे.

सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुमारे ४० हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तकामी ठेवण्यात आले आहेत. त्यात पाचही सहपोलीस आयुक्त, ७ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २५ पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.

याव्यक्तिरिक्त आरपीएसफ, आरपीसी आणि क्यूआरटीच्या पथकाला विविध ठिकाणी तैनात केले जाणार आहे. स्वतः पोलीस आयुक्त पोलीस बंदोबस्ताची पाहणी करणार आहेत. बंदोबस्तात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा आदेशच पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आला आहे. मुंबई शहरात संभाव्य अतिरेकी हल्ल्याचा धोका पाहता शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती दखल घेतली आहे. शहरातील विविध रेल्वे स्थानके, शासकीय-निमशासकीय इमारती, मंदिरे, गर्दीच्या ठिकाणी विशेषतः गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ, गोराई चौपाटी, पवई तलाव आणि इतर धार्मिक ठिकाणी तसेच राजकीय नेत्यांचे पुतळे, मॉल, गर्दीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात आली आहे. समुद्रकिनारी लाखोंच्या संख्येने मुंबईकर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येत असल्याने तिथे जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून घातपातविरोधी तपासणी तसेच समुद्रकिनारी बोटीच्या साहाय्याने सतर्क गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी विशेष नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन तसेच शहरातील हॉटेल, लॉज आणि गॅरेजची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

छेडछाड रोखण्यासाठी विशेष पथके

मद्यप्राशन करून होणारे वाद, महिलांची छेडछाड तसेच विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला छेडछाडविरोधी पथकाची नियुक्ती केली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हिंग करणे अशा घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तळीरामांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यासाठी जागोजागाी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार आहे.

विनापरवानगी पार्ट्यांना मनाई
मुंबईकरांनी पोलिसांना सहकार्य करावे. शक्ततो पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. नवीन वर्षात पार्टी करण्यासाठी अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी तसेच हॉटेलमधील पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्काची करडी नजर असणार आहे. हॉटेलच्या टेरेसवर मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन होते. विनापरवानगी अशा पार्ट्यांना मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षात मोठ्या प्रमाणात बनावट मद्य आणि अवैध दारूची तस्करी होते. त्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मढ, मार्वे, गोरेगाव येथील संजय गांधी उद्यान तसेच दहिसर परिसरात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस पार्ट्या चालत असल्याने तिथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांसोबत सशस्त्र दलासह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच नवीन वर्षात विविध ठिकाणी कार्यक्रम करणार्‍या आयोजकांनाही योग्य त्या सूचना देणयात आल्या आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे वाहतूक पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबईकरांना कुठलीही समस्या असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

कांचनवाडीत शेतकर्‍यावर विळ्याने हल्ला; चौघांवर गुन्हा

Next Post

कुपवाड मध्ये नववर्षाच्या स्वागताला कीर्तन महोत्सव..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड मध्ये नववर्षाच्या स्वागताला कीर्तन महोत्सव..

कुपवाड मध्ये नववर्षाच्या स्वागताला कीर्तन महोत्सव..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group