• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल..

Admin by Admin
December 23, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आटपाडी: खबऱ्या प्रतिनिधी : आटपाडी शहरातील एका रुग्णालयामधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र म्हणून जादूटोणा करण्यात आला.

या प्रकरणी आटपाडीतील दाम्पत्यावर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. संजय दादा गेळे व अश्विनी संजय गेळे (आटपाडी) अशी त्यांची नावे आहेत. अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि.१९) दुपारी आटपाडी येथील निंबवडे येथील रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाचे नातेवाईक असल्याचे खोटी माहिती देऊन या दाम्पत्याने प्रवेश केला. यावेळी रुग्ण सोनाली शिवदास जिरे (रा. मापटेमळा, आटपाडी) हिच्या कपाळावरून बोटे फिरवत टॅबमधील मजकूर वाचून शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवून जादूटोणा व भोंदूगिरी केली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने आटपाडी तालुक्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.

दरम्यान, आटपाडी मध्ये मागील तीन वर्षांपासून नियोजनबद्धपणे धर्मांतरण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, गोपनीय पद्धतीने सुरू असलेली ही मोहीम उघडकीस आली आहे. त्यामुळे या धर्मांतरण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

निवडणुकीची धामधूम संपली; उमदेवार निघाले सहलीला

Next Post

अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात खळबळ..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात खळबळ..

अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात खळबळ..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group