मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / जयंत पाटील यांना विधानसभेमधून निलंबित करण्यात आल्याचे संतप्त पडसाद सांगलीच्या मिरजेमध्येही उमटले. सांगली आणि मिरजमध्ये राष्ट्रवादीकडून शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जयंत पाटील यांच्यावर केलेल्या निलंबन कारवाईचा निषेध नोंदवला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेला कारभार राष्ट्रवादी सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

