• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जत तालुक्यातील बाज मध्ये मतदान केंद्रावर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण ; १३ संशयीतांच्या विरोधात गुन्हा दाखल.

Admin by Admin
December 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बाज( ता.जत) येथे ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान प्रक्रियेदरम्यान जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी येथील १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनशक्ती ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान करण्यास सांगण्यावरुन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात दुर्गाप्पा आप्पा ऐवळे (वय ४३ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली.

यातील आरोपी सदाशिव ऊर्फ विकास प्रकाश बंडगर, महानिंग मुकिंदा गडदे, अक्षय महानिंग गडदे, अविराज महानिंग गडदे, विश्वास विलास बंडगर, सुनिल विलास बंडगर, राहुल बिरु गडदे, दाजी राजु गडदे, प्रकाश तानाजी गडदे, मंगेश सचिन वळकुंडे, सागर शिवाजी गडदे, रावसो महादेव गडदे, विलास दयाप्पा गडदे (सर्व रा. बाज, ता.जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी महानिंग गडदे आणि इतर १२ आरोपींनी जनशक्ती ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या कार्यकर्त्याना शिवीगाळ आणि मारहाण केली असल्याची फिर्याद दूर्गाप्पा ऐवळे यांनी फिर्याद दिली. कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या सुधारित अधिनियम २०१५ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेडगे ह्या करीत आहेत.

Previous Post

संवेदनशील मतदान केंद्रांना निरीक्षक गणेश मरकड यांची भेट

Next Post

मोठी बातमी | हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आमदार जयंत पाटील निलंबित.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आमदार जयंत पाटील निलंबित.

मोठी बातमी | हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आमदार जयंत पाटील निलंबित.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group