कडेगाव:-कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आज शांततेत पार पडला. निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन मतदानाचा आढावा घेतला. नेवरी येथे भेट देऊन त्यांनी माहिती घेतली.
कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज मतदान टप्पा पार पडला. तालुक्यातील संवेदनशील गावाना भेटी देऊन निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन झालेल्या मतदानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांचे बरोबर नायब तहसीलदार किशोर बडबडे, राजेश घाडगे उपस्थित होते.

फोटो ओळ: नेवरी ता कडेगाव येथील निवडणूक केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना व सूचना देताना निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी गणेश मरकड, नायब तहसीलदार किशोर बडबडे

