• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक! केळवदकरांचे जहाल आंदोलन

- केळवदकरांनी निषेध आंदोलनाचा गाठला कळस!

Admin by Admin
December 11, 2022
in राजकीय
1 min read
0
ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक! केळवदकरांचे जहाल आंदोलन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भाजपा नेत्याच्या ‘महापुरुषांनी भीक मागून शाळा उभारल्या’ या वक्तव्याचा राज्यात निषेध करण्यात आला. पुण्यात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यामुळे निर्माण झालेले वादंग शांत झाले नसतानाच, आता बुलढाणा जिल्ह्यातील आक्रमक परिवर्तनवादी केळवद (ता.चिखली) या गावाने निषेधाचा कळस गाठलाय! आज, रविवारी गावातील लहान बालकांनी मंत्री चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवाबद्दलच्या लज्जास्पद विधानाने जिल्ह्यातील संतापाची लाट उसळली. मागील दोन महिन्यांपासून वादग्रस्त विधानावर आक्रमक व आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त होणार्‍या केळवदकरानी आज, ११ तारखेला बसथांबा परिसरात असेच आंदोलन करून पुन्हा एकदा जिल्ह्यात गहजब उडवून दिला.

वादग्रस्त विधान व शाईफेकमध्ये पत्रकारांना खेचण्याचा प्रयत्न करणार्‍या पाटील यांची प्रतिमा रस्त्यावर ठेवून चारेक वर्षांच्या तीन बालकांनी आळीपाळीने मूत्राभिषेक केला! यावेळी ज्येष्ठानी निषेधाच्या गगनभेदी घोषणा करून मलकापूर जालना राज्य महामार्ग दणाणून सोडला. या आंदोलनात गणेश निकम केळवदकर, नारायण वाणी, नांदूअप्पा, बाजीराव उमाळे, राम हिंगे, गोपाळ वाघमारे, धनु पाटील, विजय ठेंग, अशोक मोहिते, गोपाळ भोसले, विरु यंगड, भगवान अप्पा, किसना गवते, भारत पवार यासह गावकरी निर्भीडपणे अभिषेक आंदोलनात सहभागी झाले.

हा तर सत्तेचा उन्माद

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना संतप्त शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे. यामुळे ते महापुरुषांचा ठरवून केल्याप्रमाणे अपमान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी आता तरी भानावर यावे, असे आवाहन त्यांनी केले. महामानवांचा अपमान करणार्‍यांना प्रतिबंध करण्यासाठी कडक कायदा तयार करण्याची मागणी गणेश निकम यांनी केली.

Previous Post

मिरज शहर परिवर्तन समिती पुन्हा आक्रमक…! रस्त्यावरच मारला ठिय्या.

Next Post

मिरज तालुक्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज तालुक्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून

मिरज तालुक्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group