• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

एलसीबीचे डेरिंगबाज “शिंदे”..! गुन्हेगारांचे वांदे अन् कर्मचाऱ्यांचे खांद्याला खांदे.?

२ पिस्तूल- ५ जिवंत काडतुसे जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

Admin by Admin
November 28, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
एलसीबीचे डेरिंगबाज “शिंदे”..! गुन्हेगारांचे वांदे अन् कर्मचाऱ्यांचे खांद्याला खांदे.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : संकेतराज बने : खबऱ्या विशेष

जिल्ह्यातील गुन्हेगारांवर पाळत ठेवून वेळीच त्यांच्या मुस्क्या आवळण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अगदी प्रामाणिकपणे व चोख करीत आहे. या विभागाची सत्ता पोलीस निरीक्षक शिंदेंच्या हाती आहे. याच विभागातील “चाणक्य” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पथकाचे नेतृत्वही सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्याकडेच आहे. यांच्या चपळाईमुळे गुन्हेगारांचे मात्र वांदे झाल्याचे दिसून येत आहे. तर एलसीबी चे कर्मचारीही अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदे लावून जोरदार कामगिरी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कासेगाव येथे सापळा रचून कऱ्हाड येथील तरुणाकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. प्रवीण खाशाबा जाधव (वय ३७ रा. कराड, जि. सातारा ) असे संशयिताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी त्यासाठी विशेष पथक नियुक्त केला आहे. कासेगाव परिसरात एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना एका तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात सापळा रचला. अष्टविनायक फॅब्रिकेटर्सच्या समोर एकजण पिशवी घेऊन संशयास्पदरित्या वावरताना पोलिसांना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या पिशवीत असलेली दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे असा ८१ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. ही पिस्तूल त्याने आटपाडी येथील परशुराम करवले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलीस चौकशीत संशयित प्रवीण याच्याकडे बंदूक वापरण्यासाठी आवश्यक असणारा शासकीय परवाना नसल्याचे आढळले. संशयित प्रवीण याच्याविरोधात कासेगाव पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार । संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

Next Post

“…. अन्यथा महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू” ; मिरज शहर परिवर्तन समिती आक्रमक..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“…. अन्यथा महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू” ; मिरज शहर परिवर्तन समिती आक्रमक..!

".... अन्यथा महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू" ; मिरज शहर परिवर्तन समिती आक्रमक..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group