• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार । संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार : एक लाख रूपये आणि ताम्रपत्र मिळणार.

Admin by Admin
November 28, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार । संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमीतर्फे दिला जाणारा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्यनिर्माते, भारतीय तंतुवाद्य केंद्राचे संचालक मजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रूपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारामुळे मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रात बहुमानाचा तुरा खोवला गेला आहे. मजीद सतारमेकर हे आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीदसाहेब यांचे पाचव्या पिढीतील वंशज आहेत.

मिरज शहर हे तंतुवाद्यनिर्मितीसाठी जगभर प्रसिध्द आहे. शहरातील आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांनी या व्यवसायाची मुहुर्तमेढ येथे रोवली. त्यानंतर दीडशे वर्षांहून अधिक काळ येथे तंतुवाद्यनिर्मेतीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. फरीदसाहेबानंतर पीरसाहेब, हुसेनसाहेब, आबासाहेब, गुलाबसाहेब यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. गुलाबसाहेब यांचे पुत्र मजीद सतारमेकर यांनी आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या तंतुवाद्यनिर्मितीचा वारसा तितक्याच निष्ठेने जोपासला आहे. मजीद सतारमेकर हे गेली ४५ वर्षे तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. देशविदेशातील नामांकित गायक-वादकांना त्यांनी दर्जेदार तंतुवाद्ये पुरविली आहेत. तंतुवाद्यनिर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे वाद्यनिर्मितीतील कौशल्य पाहून त्यांना जपान आणि फ्रान्समध्ये तंतुवाद्यानिर्मिती कार्यशाळेसाठी आमंत्रित आले होते. मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक सतारमेकर यांनी जपान येथे तंतुवाद्यनिर्मितीची कार्यशाळा घेतली होती.

देशातील अनेक सुप्रसिध्द संगीत महोत्सवांमध्ये तंतुवाद्यांचा मजीद सतारमेकर पुरवठा करतात मिरजेतील संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ संगीत महोत्सव, श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव, आबासाहेब सतारमेकर स्मृति संगीत महोत्सव यांसह अन्य संगीत महोत्सवांच्या संयोजनात मजीद सतारमेकर यांचा मोठा वाटा आहे.

तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी संस्थेने त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. संगीत नाटक अकादमी ही देशातील संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्था आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांच्या पालकत्वाखाली ही संस्था काम करते. संगीत, नाटक आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशातील कलाकाराला या संस्थेच्यावतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मजीद सतारमेकर यांना तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात केलेल्या भरीव कामाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रूपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मजीद सतारमेकर म्हणाले, हा पुरस्कार आमचे पुर्वज फरीदसाहेब आणि त्यानंतरच्या पिढीतील कलाकारांनी घेतलेल्या परिश्रमांचे फळ आहे. मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रातील सर्वच कलाकारांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे. थोरले बंधू नौशाद, मैनुद्दीन, पुतण्या नहीम, मुलगा अतिक आणि सर्व कुटुंबियांचे सहकार्य या कामी लाभले आहे. मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्राला बळ देणाऱ्या संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ यांच्या १५० व्या जयंतीवर्षात हा पुरस्कार मिळणे हा सुवर्णयोग असल्याचे मजीद सतारमेकर यांनी सांगितले. मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव समिती आणि संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ संगीत समितीच्या संयोजकांचेही सहकार्य वेळोवेळी मिळत गेल्याचे मजीद सतारमेकर यांनी सांगितले.

Previous Post

अतिक्रमणाच्या अडचणीमुळे बसची दुचाकीला धडक.

Next Post

एलसीबीचे डेरिंगबाज “शिंदे”..! गुन्हेगारांचे वांदे अन् कर्मचाऱ्यांचे खांद्याला खांदे.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
एलसीबीचे डेरिंगबाज “शिंदे”..! गुन्हेगारांचे वांदे अन् कर्मचाऱ्यांचे खांद्याला खांदे.?

एलसीबीचे डेरिंगबाज "शिंदे"..! गुन्हेगारांचे वांदे अन् कर्मचाऱ्यांचे खांद्याला खांदे.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group