कडेगाव:- कडेगाव व पलूस तालुक्यातील सर्व युवक आणि युवकांनी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा सर्वांनी ८ डिसेंबर २०२२ पूर्वी आपली मतदार नोंदणी करावी असं आवाहन प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाली आहे अशा सर्वांनी ८ डिसेंबर २०२२ पूर्वी आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी गावातील बी एल ओ यांच्याकडे नमुना नंबर ६ च्या अर्जासह वयाचा पुरावा, आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांची नक्कल तसेच एक रंगीत फोटो जमा करावा. तसेच तहसील कार्यालय कडेगाव व पलूस यांचे वतीने २६, २७ नोव्हेंबर २०२२ आणि ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी मतदार नोंदणी साठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व युवा मतदार बंधू भगिनींना याचा लाभ घ्यावा असे ही आवाहन मरकड यांनी केलं आहे.

