
मिरज खबऱ्या प्रतिनिधी / मिरजेतील धनगरी ढोलचा आनंद कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतला. भारत जोडो यात्रे निमित्त सध्या राहुल गांधी हिंगोली येथे आहेत. मिरजेतील तंतूवाद्याची संपूर्ण किर्ती जगप्रसिध्द आहे. दहा दिवसापूर्वी मिरजेतील राजू मधुकर मिरजकर यांच्या दुकानातून अंकलखोप येथील देवा हजारे यांनी तीन धनगरी ढोल खरेदी केले होते. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशभर भारत जोडो यात्रेनिमित्त संवाद साधत आहेत.
सोमवारी हिंगोली जिल्हयात त्यानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी धनगरी ढोलाचे वादन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी खांद्यावर घोंगडे धारण करून स्वतः धनगरी ढोल वाजवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. सदरचा हा ढोल मिरजेतील राजू मिरजकर यांनी तयार केला आहे. त्यामुळे मिरजेच्या संगीत आणि वाद्य क्षेत्राची ख्याती देशभर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मिरजेत तयार झालेल्या धनगरी ढोलाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मनमुराद आनंद घेतल्याचे दिसून आले, आणि त्यातूनच त्यांना या धनगरी पेशामुळे अजून बळ मिळेल.

