• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सांगली दौऱ्यावर

Admin by Admin
November 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सांगली दौऱ्यावर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी (दि. 13) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या समवेत कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे हे असणार आहेत, अशी माहिती भाजपच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी शनिवारी दिली.

मोहन वनखंडे म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा सांगली जिल्हा दौरा यशस्वी करण्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित झाले. ते सकाळी सांगली येथे गणेशाचे दर्शन घेतील.

त्यानंतर सांगलीतून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता पक्षाची जिल्हा संघटनात्मक बैठक व मेळावा होणार आहे. त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तेथेच पक्षाच्या सोशल मीडियाची बैठक होणार आहे. त्यानंतर सांगलीच्या खणभाग येथे बूथ कमिटीची बैठक होणार आहे. खणभाग येथे नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमास आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी मिरजेतील भारत नगर येथे युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवार पेठ या ठिकाणी धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमास ही ते उपस्थित राहणार आहेत. रात्री मिरजेतील वखार भाग येथे असणाऱ्या पाटीदार भवन येथे सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 133 कोटी माफ होणार.

Next Post

‘जादुटोणा करुन राष्ट्रवादीनं उद्धवना जाळ्यात ओढलं’, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर गदारोळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘जादुटोणा करुन राष्ट्रवादीनं उद्धवना जाळ्यात ओढलं’, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर गदारोळ

'जादुटोणा करुन राष्ट्रवादीनं उद्धवना जाळ्यात ओढलं', चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर गदारोळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group