• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 133 कोटी माफ होणार.

मालगाव मधील शेतकऱ्यांचे 45 कोटी होणार माफ: मालगाव ग्रामस्थांकडून ना. सुरेश खाडे यांचा सत्कार

Admin by Admin
November 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 133 कोटी माफ होणार.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भू विकास बँकेची 968 कोटींची थकबाकी माफ होणार आहे. मिरज तालुक्यातील मालगाव च्या 45 कोटी सह सांगली जिल्ह्यातील 133 कोटींचे थकबाकी माफ होणार आहे. त्यामुळे आज मालगावच्या ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये भूविकास बँकेच्या शाखा होत्या. विविध कर्जापोटी 968 कोटींची थकबाकी होती. ही थकबाकी माफ व्हावी यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुढाकार घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही थकबाकी माफ करण्याची घोषणा केली. त्याचा फायदा सांगली जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे मालगाव येथील प्रकाश पाणीपुरवठा योजनेची 43 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. शिवाय मालगाव मधील इतरही शेती व्यवसायाचे सुमारे दोन कोटीहून अधिकची रक्कम माफ होणार आहे. त्यामुळे आज पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मालगावच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण राजमाने, मालगाव चे माजी उपसरपंच शशिकांत कनवाडे, ग्रामपंचायत सदस्य विजय आवटी विश्वास खांडेकर, शेतकरी संघटनेचे संजय खोलकुंबे, डॉ गाताडे, महेश कोकणे, गंगाधर येलपरटे उपस्थित होते.

Previous Post

कुंकू न लावलेल्या महिला पोलिसासमोर संभाजी भिडे एकदम नम्र; फोटो होतं व्हायरल…

Next Post

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सांगली दौऱ्यावर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सांगली दौऱ्यावर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सांगली दौऱ्यावर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group