• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज शहर परिसरात गुन्ह्यातून दहशत निर्माण करणाऱ्या गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीला मोक्का..

Admin by Admin
November 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज शहर परिसरात गुन्ह्यातून दहशत निर्माण करणाऱ्या गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीला मोक्का..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : मिरज शहरासह परिसरात गुन्ह्यातून दहशत निर्माण करणाऱ्या गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली.

या टोळीतील चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली असून, एकजण पसार आहे. संपुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार आहोत, असा निर्धार पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.

मोमीन टोळीचा म्होरक्या गौस उर्फ निहाल गब्बर मोमीन (वय २८, रा. धनगर गल्ली, बुधवार पेठ, सध्या रा. मिरज), समर्थ संजय गायकवाड (वय १८, रा. हाडको कॉलनी, शंभर फुटी, मिरज), जावेद बंडुखान शेख (वय २७, रा. झरी मस्जीद जवळ, मिरज) व एक अल्पवयीन अशा चौघांचा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांत समावेश आहे.

मोमीन टोळी प्रमुख गौस मोमीन याने वरील सर्व साथीदारांसह मिरजेत गेल्या चार वर्षात टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली होती. मोमीन टोळीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, बनावट नोटा बाजारात आणणे, पिस्तुल बाळगणे हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्यात केले आहेत. मोमीन टोळीवर मोका अंतर्गत कारवाईसाठी गांधी चाैक पोलिसांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. पोलिस अधीक्षकांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावास पोलिस महानिरीक्षक लोहिया यांनी मंजुरी दिली असून मोमीन टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे.

Previous Post

कडेगाव तालुक्यातून अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमात…

Next Post

झाडावर दुचाकी आदळल्याने लिंगनूरच्या युवकाचा मृत्यू.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
झाडावर दुचाकी आदळल्याने लिंगनूरच्या युवकाचा मृत्यू.

झाडावर दुचाकी आदळल्याने लिंगनूरच्या युवकाचा मृत्यू.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group