• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

झाडावर दुचाकी आदळल्याने लिंगनूरच्या युवकाचा मृत्यू.

Admin by Admin
November 5, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
झाडावर दुचाकी आदळल्याने लिंगनूरच्या युवकाचा मृत्यू.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : मिरज – लिंगनूर रस्त्यावर झाडावर मोटारसायकल आदळल्याने सुमित रमेश गुरव (वय 23, रा. लिंगनूर) या तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने संबंधिताचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित गुरव हा मोटारसायकल वरून लिंगनूरकडे निघाला होता. त्याचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने मोटारसायकल थेट झाडावर जाऊन आदळली. अपघातात गंभीर जखमी झालेला सुमित हा रस्त्याकडेला सुमारे तासभर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच सुमित याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु वेळेत रुग्णवाहिका न आल्याने सुमित याला एका टेम्पोमध्ये घालून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच सुमित याचा मृत्यू झाला.

वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर सुमितवर उपचार करून त्याचे जीव वाचले असते. वेळेत रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्यानेच सुमित याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

मिरज शहर परिसरात गुन्ह्यातून दहशत निर्माण करणाऱ्या गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीला मोक्का..

Next Post

पोलिस निरीक्षक रवींद्र कदम निलंबित..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिस निरीक्षक रवींद्र कदम निलंबित..

पोलिस निरीक्षक रवींद्र कदम निलंबित..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group