• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!

Admin by Admin
October 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेस पोलिसांनी जेरबंद केले.

अनघा अनंत जोशी (वय ६१, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव असून, तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांची रोकड, असा सहा लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक सुशिक्षित वयस्कर महिला गर्दीचा फायदा घेऊन चोरी करून निघून जात असल्याचे दिसून आले होते.

यानंतर पोलिसांनी तपास आणखी वाढवत जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, शाहूवाडी, शिरोळ, मलकापूर, साखरपा व रत्नागिरी येथील बसस्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात संशयित अनघा जोशी ही सांगलीत चोरी करून याच मार्गावरून रत्नागिरीला जात असल्याचे दिसून आले. चार ते पाच महिन्यांपासून पोलीस या महिलेची माहिती घेत होते. त्यानुसार पोलिसांनी सांगली बसस्थानकावर चोरी करणारी जोशी हीच महिला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले. सांगली शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणारी जोशी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी तिच्यावर लांजा व देवरुख पोलिसांतही गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून सांगली शहर, शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी अटक केलेली अनघा जोशी ही रत्नागिरी येथून सांगलीत येऊन चोऱ्या करत असे. वयानेही ज्येष्ठ असलेल्या या संशयित महिलेबाबत कोणालाही संशय येत नसे. पोलिसांच्या पहिल्या तपासालाही त्यामुळे आव्हान निर्माण झाले होते.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय विजय सुतार ,दिलीप जाधव, विनायक शिंदे ,संदीप पाटील ,अभिजीत माळकर ,झाकीर काझी, स्वप्ना गराडे इत्यादींनी केली आहे.

Previous Post

सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा ; युवतीचा विनयभंग करीत कुटुंबीयांना केली मारहाण..!

Next Post

ऊसतोड मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात : लहान मुलांसह १५ जण जखमी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ऊसतोड मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात : लहान मुलांसह १५ जण जखमी.

ऊसतोड मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात : लहान मुलांसह १५ जण जखमी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group