• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा ; युवतीचा विनयभंग करीत कुटुंबीयांना केली मारहाण..!

Admin by Admin
October 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा ; युवतीचा विनयभंग करीत कुटुंबीयांना केली मारहाण..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी/ शहरातील एका युवतीच्या घरात काल, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मद्यपी प्रियकराने धिंगाणा घालून युवतीचा विनयभंग केला. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सांगली-कोल्हापूर रस्ता परिसरात राहणाऱ्या रोशन खंदारे (वय २४) या युवकाचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. रविवारी रात्री तो दारू ढोसून मध्यरात्री अडीचच्या सुमारास युवतीच्या घरी गेला. घराचे बंद दार मोठमोठ्याने ठोठावून त्याने आरडाओरडा केला. दार उघडत नसल्याचे पाहताच त्याने दारावर दगड फेकून मारण्यास सुरवात केली. पहाटेच्या सुमारास अचानक आरडाओरड्याचा आवाज आल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले.

या कालावधीत तिच्या आईने दरवाजा उघडला. प्रेमी युवकाने आईस ढकलले आणि घरात प्रवेश केला. आतमध्ये गेल्यावर ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे सांगून युवतीचा विनयभंग केला. यामुळे चिडलेल्या युवतीने त्याला ढकलून दिले. याचा राग येऊन त्याने तिच्या कानफटात मारली. भांडण सोडविण्याकरिता तिचे वडील आणि भाऊ मध्ये पडले असता दोघांनाही त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार अर्ध्या तासाहून अधिक वेळ सुरू होता. याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Previous Post

पालकमंत्री स्वतः दरोडेखोराला पकडतात. हे पोलिसांचे अपयश..? की मंत्र्यांची स्टंटबाजी..?

Next Post

सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!

सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची "ती" महिला ताब्यात..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group