• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पालकमंत्री स्वतः दरोडेखोराला पकडतात. हे पोलिसांचे अपयश..? की मंत्र्यांची स्टंटबाजी..?

Admin by Admin
October 24, 2022
in माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
पालकमंत्री स्वतः दरोडेखोराला पकडतात. हे पोलिसांचे अपयश..? की मंत्र्यांची स्टंटबाजी..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी भर दुपारी एका बंगल्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला पकडले आहे.

मालेगाव येथील कलेक्टर पट्टा परिसर हा उच्चभ्रू वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात बहुतांश नागरिक हे व्यापारी आहेत. दुपारच्या वेळेला दुपारी महिला असतील यांनी त्यांची लूट करता येईल या उद्देशाने आलेल्या दरोडेखोराला नागरिकांनी आरडाओरड करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता, तरीही दरोडेखोराने पळवून न जाता महिलांना बंदुकीचा धाक दाखवत दागिने आणि पैसे काढून देण्याची मागणी करत होता. जवळूनच जाणाऱ्या नाशिकच्या पालकमंत्र्यांना ही बाब कळली, त्यांनी तात्काळ बंगल्यात शिरून दरोडेखोराला पकडत पोलीसांच्या हवाली केले आहे. मंत्री दादा भुसे यांनी यापूर्वीही अनेकदा थेट जुगार अड्ड्यावर छापे टाकत पोलीसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकच्या इगतपुरी, सिन्नर येथील दरोडयाच्या घटना ताज्या असताना मालेगाव येथील ही धक्कादायक घटना चर्चेचा विषय ठरत आहे.

त्यातच स्वतः जिल्ह्याच्या पळकमंत्र्यांनी दरोडेखोराला पकडत पोलीसांच्या हवाली केल्याने पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

मालेगाव शहरातील वाढती गुन्हेगारी ही पोलीसांच्या कामगिरीचे अपयश असल्याची चर्चा सुरू असून भुसे यांनी पकडलेल्या दरोडेखोरांची चर्चा होत आहे.

एखाद्या राजकीय नेत्याला जर दरोडेखोर सापडू शकतात, दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतः जाऊन कारवाई करावी लागते तर मग पोलीस काय करताय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

मालेगाव येथील याच परिसरात गेल्या आठवड्यात एक चारचाकी वाहन चोरी झाले होते, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी अशा घटना वारंवार घडत आहे.

अशी बाब असली तरी दुसरीकडे स्वतः पालकमंत्री हे पोलिसांना सूचना करुन कारवाई करायला लावू शकतात, स्वतःचा जीव धोक्यात घालून कारवाई करण्याची हिंमत दाखवतात त्यामुळे दादा भुसे यांचा पोलिसांवर पालकमंत्री म्हणून वचक नाही का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Previous Post

खड्ड्यांना मंत्री गडकरी आणि खासदार बारणेंचे नाव देत केली निषेधाची दिवाळी..!

Next Post

सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा ; युवतीचा विनयभंग करीत कुटुंबीयांना केली मारहाण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा ; युवतीचा विनयभंग करीत कुटुंबीयांना केली मारहाण..!

सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा ; युवतीचा विनयभंग करीत कुटुंबीयांना केली मारहाण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group