• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“अवैध धंदे बंद होतील, तेव्हाच पोलिसांची प्रतिमा सुधारेल : सर्व अवैध धंदे मोडीत काढू : नूतन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली.”

Admin by Admin
October 23, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
“अवैध धंदे बंद होतील, तेव्हाच पोलिसांची प्रतिमा सुधारेल : सर्व अवैध धंदे मोडीत काढू : नूतन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली.”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : शनिवारी सांगली जिल्ह्याला मिळालेल्या नव्या पोलीस प्रमुखांची थाटात इंट्री झाली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे मोडून काढण्यात येतील. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नूतन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

आ. सुरेश खाडे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे जाहीर करीत गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. खा. संजय पाटील यांनीही जिल्ह्यात अवैध धंदे वाढले असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर काहीच दिवसात मावळते पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची बदली होऊन त्यांच्या जागी डॉ. तेली यांची नियुक्ती झाली. दीक्षित कुमार गेडाम यांच्याकडून डॉ. तेली यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतला. यानंतर सायंकाळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, माझी जळगाव, औरंगाबाद, पुणे, वर्धा, नागपूर या ठिकाणी कोकण विभाग वगळता इतर विभागात सेवा झाली आहे. या ठिकाणच्या अनुभवावर मी या ठिकाणी बेसिक पॉलिसी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गुन्हा घडल्यास तत्काळ त्याचा छडा लागून दोषीवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘पोलिस काका आणि पोलिस दीदी’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येईल. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यावर माझा भर राहील. लोकांच्यात सायबर व आर्थिक गुन्हे जनजागृतीसाठी मोहीम उघडण्यात येईल.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/10/VID-20221023-WA0346.mp4

 

एस पी डॉ. बसवराज तेली म्हणाले, जादा परतावा देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचे गुन्हे राज्यात सर्वत्र पहायला मिळत आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रकरणाचे गुन्हे दाखल करून घेऊन छडा लावला जाईल. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

Previous Post

अखेर शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा किट वाटप सुरू

Next Post

खड्ड्यांना मंत्री गडकरी आणि खासदार बारणेंचे नाव देत केली निषेधाची दिवाळी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खड्ड्यांना मंत्री गडकरी आणि खासदार बारणेंचे नाव देत केली निषेधाची दिवाळी..!

खड्ड्यांना मंत्री गडकरी आणि खासदार बारणेंचे नाव देत केली निषेधाची दिवाळी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group