• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : शेजाऱ्यालाच पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या दांपत्यास चोरी प्रकरणी अटक….!

Admin by Admin
October 19, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : शेजाऱ्यालाच पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या दांपत्यास चोरी प्रकरणी अटक….!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : येथील मार्केट यार्डसमोरील किसान चौकातील युनूस खुदूस नदाफ (वय 23) यांच्या घरात 20 दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी यश आले.

शेजारी राहणार्‍या दाम्पत्याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे.

सुभानअल्ला मुसा नदाफ (वय 29) व मोबीना सुभानअल्ला नदाफ (21, दोघे रा. किसान चौक, सांगली) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. युनूस यांच्या घरातून त्यांनी पाच लाख 17 हजाराची रोकड लंपास केली होती. यातून त्यांनी सोन्याचा नेकलेस व कर्णफुले खरेदी केली होती. हे दागिने व तीन लाख 85 हजाराची रोकडही त्यांच्याकडून जप्त केली आहे.

फिर्यादी युनूस नदाफ व संशयित दाम्पत्य शेजारीच राहतात. त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. दि. 29 ऑक्टोबर रोजी युनूस यांच्या घरातील कपाटातून पाच लाख 17 हजाराची रोकड लंपास झाली होती. भरदिवसा हा प्रकार घडला होता. दोन-तीन दिवस युनूस यांनी घरातील लोकांकडे चौकशी केली. तथापि रोकड लंपास झाल्याबाबत कोणाला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी दि. 3 ऑक्टोबर रोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक या गुन्ह्याचा सखोल तपास करीत होते. त्यावेळी पथकाला सोमवारी युनूस यांच्या घरातील चोरी शेजारील नदाफ दाम्पत्याने केली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना संशय आल्याची माहिती मिळताच दाम्पत्याने येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दागिने व रोकड घेऊन ते इनाम धामणी रस्त्यावर शांतीबन चौकातून परगावी निघाल्याचे समजले.

पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची झडती घेण्यात आली. त्यावेळी सोन्याचा एक नेकलेस, कर्णफुले व तीन लाख 85 हजाराची रोकड सापडली. पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली. तथापि ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसी खाक्या दाखविताच सुभानअल्ला नदाफ याने युनूस यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली.

चोरलेल्या पैशातून त्याने पत्नीला नेकलेस व कर्णफुले खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा सर्व ऐवज जप्त केला आहे. त्यांना पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सतील शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संंग्राम निशानदार, हवादार बिरोबा नरळे, निलेश कदम, संदीप पाटील, सागर लवटे, विक्रम खोत, संदीप गुरव, जितेंद्र जाधव, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संतोष गळवे, स्नेहल पाटील, शुभांगी मुळीक, सुरेखा कुंभार, रंजना कलगुडगी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील दाम्पत्याला बुधवार दि. 19 ऑक्टोबर रोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्यांच्या घराचीही झडती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

उठा उठा दिवाळी आली : पाकिटासाठी याद्या बनवण्याची वेळ झाली…?

Next Post

पलूसच्या महावितरण कार्यालयात ‘अँटी करप्शन’ची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पलूसच्या महावितरण कार्यालयात ‘अँटी करप्शन’ची कारवाई

पलूसच्या महावितरण कार्यालयात 'अँटी करप्शन'ची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group