• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पलूसच्या महावितरण कार्यालयात ‘अँटी करप्शन’ची कारवाई

उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता जाळ्यात : 45 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले

Admin by Admin
October 19, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पलूसच्या महावितरण कार्यालयात ‘अँटी करप्शन’ची कारवाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पलूस : खबऱ्या प्रतिनिधी/ पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तक्रारदार यांच्या कंपनीने सादर केलेल्या सोलर इन्स्टॉलेशनची फाईल मंजूर करण्याकरिता उपकार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेठकर, रा. तासगाव यांना 45 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण, रा. नवेखेड चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.

याबाबत घाटगे यांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांनी पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात सोलर इन्स्टॉलेशनची फाईल सादर केली होती. ती फाईल मंजूर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता अतुल पेठकर व सहाय्यक अभियंता सागर चव्हाण यांनी संबंधिताला 45 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत संबंधिताने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 28, 29 व 30 सप्टेंबर तसेच 3 ऑक्टोबर रोजी चौकशी केली होती. पेठकर व चव्हाण यांच्या विरोधात सापळा रचून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यावेळी पेठकर व चव्हाण यांनी तक्रारदाराला 45 हजार रुपयांचे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर आज संबंधिताला 45 हजार रुपये घेऊन पेठकर व चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी पेठकर यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी करून 45 हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले. याप्रकरणी सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, अविनाश सागर, धनंजय खाडे, राधिका माने, संजय सपकाळ, प्रीतम चौगुले, रवींद्र धुमाळ, अजित पाटील, विना जाधव यांच्या पथकाने केली.

Previous Post

सांगली : शेजाऱ्यालाच पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या दांपत्यास चोरी प्रकरणी अटक….!

Next Post

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्यावर जबरदस्तीने 353 चा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आर.टी.ओ. प्रशासनाच्या निषेधार्थ कडेगाव तहसिल कार्यालयावर रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेचे निदर्शने आंदोलन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्यावर जबरदस्तीने 353 चा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आर.टी.ओ. प्रशासनाच्या निषेधार्थ कडेगाव तहसिल कार्यालयावर रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेचे निदर्शने आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्यावर जबरदस्तीने 353 चा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आर.टी.ओ. प्रशासनाच्या निषेधार्थ कडेगाव तहसिल कार्यालयावर रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेचे निदर्शने आंदोलन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group