Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तत्कालीन पोलीस उपाधीक्षक धिरज पाटलांचा उलटतपास पूर्ण : अनिकेत कोथळे खून प्रकरण

Admin by Admin
October 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
तत्कालीन पोलीस उपाधीक्षक धिरज पाटलांचा उलटतपास पूर्ण : अनिकेत कोथळे खून प्रकरण

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणीस सोमवारपासून सुरुवात झाली. गत सुनावणीवेळी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांचा सरतपास घेण्यात आला होता.

सोमवारी बचाव पक्षाकडून उलटतपास पूर्ण करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फेरतपास घेतला.

थर्ड डिग्रीचा अवलंब करून सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ ला संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. या घटनेने राज्याच्या पोलीस दलाला हादरा बसला होता. या खटल्यात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मांडत आहेत. आजपासून सुनावणीला सुरुवात झाली.

या खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झालेला आहे. गेल्या सुनावणीत तत्कालीन उपअधीक्षक धीरज पाटील यांची साक्ष नोंदवली. अनिकेत कोथळे खून खटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनिल लाड याची चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान साऱ्या खुनाचा उलगडा झाला.

घटनास्थळ, महादेवगड डोंगर येथे मृतदेह जाळलेले ठिकाणही दाखविल्याची साक्ष नोंदविल्याचे त्यांनी सरतपासात सांगितले होते. त्यानंतर आज बचाव पक्षाने उलटतपास घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेले पत्र, वाहन नोंदी याविषयी विचारण्यात आले. यावेळी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. साक्षीदार पाटील यांचा बचाव पक्षाचे ॲड. विकास पाटील-शिरगावकर, ॲड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार यांनी उलटतपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग : आरटीओ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप करत आरडाओरडा करून स्वतःचे कपडे काढून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल..!

Next Post

कडेगावमध्ये महसूल महिलांनी सिद्ध केलं “हम भी कम नहीं”..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगावमध्ये महसूल महिलांनी सिद्ध केलं “हम भी कम नहीं”..!

कडेगावमध्ये महसूल महिलांनी सिद्ध केलं "हम भी कम नहीं"..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014