• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग : आरटीओ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप करत आरडाओरडा करून स्वतःचे कपडे काढून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल..!

Admin by Admin
October 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग : आरटीओ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप करत आरडाओरडा करून स्वतःचे कपडे काढून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangli Crime : khabarya media online : सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये आरटीओ अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणाने स्वत:चे कपडे उतरवून देण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगली जिल्ह्यासह पोलिस दलातही खळबळ उडाली होती.

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद मांडवे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 12 ऑक्टोबर रोजी कडेगावमध्ये ही घटना घडली होती. आरटीओ कॅम्पमध्ये ट्रॉली पासिंगसाठी आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप त्याने केला होता.

लाच मागितल्यानंतर प्रमोदचा पारा चांगलाच चढला. त्याने आरटीओ अधिकाऱ्यांसमोर सरळ कपडे उतरवून देण्यास सुरुवात केल्यानंतर अधिकारीही बावचळले होते. कडेगावमधील या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. प्रमोद मांडवे हे आपली गाडी पासिंग करण्यासाठी कडेगाव आरटीओ कॅम्पमध्ये गेले होते.

मात्र, यावेळी मांडवे यांना त्यांची गाडी पासिंग करण्यासाठी लाच मागणीचा प्रकार घडला. गाडीचे सर्व कागदपत्रे रीतसर असताना लाच कशासाठी द्यायची? असे म्हणत मांडवीचा पारा चढला. त्यानंतर त्याने स्वतःचे कपडे काढून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे कपडे घेण्यासाठी लागले. मांडवें मुळे अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली होती.

Previous Post

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे – फडणवीसांमध्ये मतभेद.? चर्चांना उधाण..!

Next Post

तत्कालीन पोलीस उपाधीक्षक धिरज पाटलांचा उलटतपास पूर्ण : अनिकेत कोथळे खून प्रकरण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तत्कालीन पोलीस उपाधीक्षक धिरज पाटलांचा उलटतपास पूर्ण : अनिकेत कोथळे खून प्रकरण

तत्कालीन पोलीस उपाधीक्षक धिरज पाटलांचा उलटतपास पूर्ण : अनिकेत कोथळे खून प्रकरण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group