• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावमध्ये महसूल महिलांनी सिद्ध केलं “हम भी कम नहीं”..!

आणखी एक महिला तलाठी लाचलुचपत च्या रडारवर येण्याची शक्यता..?

Admin by Admin
October 19, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
कडेगावमध्ये महसूल महिलांनी सिद्ध केलं “हम भी कम नहीं”..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- कडेगाव महसूल यंत्रणेतील महिला कर्मचाऱ्यांनी सिद्ध केलं आहे की हम भी कम नहीं. हो बरोबर कारण अजून खेराडे वांगीची महिला तलाठी मनीषा कुलकर्णी लाच घेताना सापडून आठ दिवस होत नाहीत तोपर्यंत आणखी एका महिला तलाठ्याने उमेदवाराकरवी सातबारा वरती खरेदी दस्ताची नोंद धरण्यासाठी लाच स्वीकारली होती मात्र त्या शेतकऱ्याचे काम केलं नव्हतं. इकडं कुलकर्णी तलाठ्यावर कारवाई झाल्यानंतर ते काम करून देण्यात आले. सगळेच भ्रष्ट नसतात महसूल प्रशासनात आपलं काम अगदी चाकोरीत राहून प्रामाणिकपणे करणाऱ्या महिला असो अथवा पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा आहे मात्र भ्रष्ट लोकांच्या कारभाराने सर्वांना एकाच दृष्टीने पाहिलं जातंय.

कडेगाव तालुक्यातील महसूल यंत्रणेला भ्रष्ट कारभाराने अक्षरशः पोखरलं आहे. सर्वसामान्य जनतेचं कोणतंही काम काही कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय करतच नाहीत हे सर्वज्ञात आहे. मागील महिन्यात कार्यालयातील अव्वल कारकून सुनील चव्हाण लाच घेताना दुसऱ्यांदा सापडल्यानंतर वाटलं होतं की महसूल यंत्रणेच्या कामकाजात काहीतरी सुधारणा होईल पण अजून महिना व्हायच्या अगोदरच खेराडे वांगीची महिला तलाठी मनीषा कुलकर्णी १५ हजारांची लाच घेताना सापडली. आता कुलकर्णी सापडून अजून आठ दिवस झाले नाहीत तोपर्यंत आणखी महिला तलाठ्याने खरेदी दस्ताची नोंद धरण्यासाठी आपल्या कडे असणार्या उमेदवारा मार्फत संबंधित शेतकऱ्याकडून लाच घेतल्याचा प्रकार गोपनीय खबऱ्याला समजला असून कुलकर्णी तलाठ्यावरील कारवाई नंतर संबंधित शेतकऱ्याचे काम तातडीने करून देण्यात आलं आहे.

लाचलुचपत विभागाची कारवाई थोडी क्लिष्ट असते त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी/ग्रामस्थ इकडे तक्रार करण्या ऐवजी भ्रष्ट लोकांना पैसे देऊन आपलं काम करून घेण्याचा प्रयत्न करतो पण तक्रारी नंतर पडताळणी करून भ्रष्ट लोकांना लाचलुचपत कडून दणका हा दिलाच जातो आणि अशा दणक्याने भविष्यात इतर लोकांच्या कामकाजात नक्कीच सुधारणा होईल अशीच अपेक्षा असते मात्र कडेगाव तालुक्यात ह्या सर्व आशा अपेक्षांना तिलांजली मिळताना दिसत आहे. इथं भ्रष्ट कारभाराची चढाओढ लागल्याचं स्पष्ट दिसत आहे. पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आता महिला ही उतरल्या असून हम भी कम नहीं असंच बहुधा म्हणत असाव्यात.

Previous Post

तत्कालीन पोलीस उपाधीक्षक धिरज पाटलांचा उलटतपास पूर्ण : अनिकेत कोथळे खून प्रकरण

Next Post

उठा उठा दिवाळी आली : पाकिटासाठी याद्या बनवण्याची वेळ झाली…?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उठा उठा दिवाळी आली : पाकिटासाठी याद्या बनवण्याची वेळ झाली…?

उठा उठा दिवाळी आली : पाकिटासाठी याद्या बनवण्याची वेळ झाली...?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group