खबऱ्या प्रतिनिधी: महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील सर्वात मोठे असलेले शहर मिरज हे खूप संवेदनशील शहर आहे. त्याचबरोबर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मिरज शहर मानले जाते. मिरज शहराला नियंत्रित करण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज लागते.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याशी मिरज शहराच्या बाबतीत विविध प्रश्नांवर चर्चा करून मिरज शहर पत्रकार संघाने त्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. सोबतच नव्याने पदभार स्वीकारलेले वाहतूक नियंत्रण शाखेचे साहेब पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळेस मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष व सी न्यूज चे मिरज प्रतिनिधी अरुण लोंढे, तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार के के जाधव, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे, लोकसत्ता चे ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे, दैनिक केसरीचे मोहन वाटवे, प्रतिध्वनीचे संपादक सुकुमार पाटील, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे, तरुण भारत चे फोटोग्राफर युवराज सोनवणे, दैनिक पुढारीचे स्वप्निल पाटील, जनप्रवासचे शरद सातपुते, मुख्यमंत्री वृत्तपत्र व गोपनीय खबऱ्याचे संपादक संकेतराज बने, दैनिक सकाळचे शंकर भोसले, दैनिक पुण्यनगरीचे जगदीश धुळुबुळू, दैनिक तरुण भारतचे प्रशांत नाईक, एस न्यूज चे इमरान मुल्ला, तिचा जागरचे प्रतिनिधी आदिल मकानदार उपस्थित होते.

