• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घेतला मिरासाहेब दर्ग्याचा आशीर्वाद. म्हणाले, मला…!

Admin by Admin
October 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घेतला मिरासाहेब दर्ग्याचा आशीर्वाद. म्हणाले, मला…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज: खबऱ्या प्रतिनिधी /मिरासाहेब दर्गा हा मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे.

हजरत मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमासुद्दीन हुसैन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दरगाहकडे येतात. हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते. असे म्हटले जाते की अल्लाहच्या आज्ञेवरून ते मक्का (सौदी अरेबिया) येथून भारतात आले होते. त्यांनी आपल्या जीवनातून इस्लामचा प्रचार केला. दरवर्षी साजरा होणाऱ्या सणात लाखो लोक याठिकाणी भेट देतात व आशीर्वाद घेतात.

आज गुरुवारच्या निमित्ताने मिरज शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत मिरासाहेब दर्ग्याला आशीर्वाद घेण्यासाठी भेट दिली. यावेळेस दर्ग्याचा इतिहास दर्ग्याचे खादिम अजगर शरीकमसलत यांनी पोलीस निरीक्षक झाडे यांना सांगितला.

यावेळेस “मी मिरजेत आपल्या चरणी आलेलो आहे, मिरज सारख्या मोठ्या शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या शहरामध्ये उत्कृष्ट पद्धतीने सेवा करण्याची संधी मिळावी. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. मला आपले आशीर्वाद द्या.” असे म्हणत पोलीस निरीक्षक झाडे नतमस्तक झाले.

कोणाशीही न बोलता नदीवरून आणले जाते पाणी..

मिरजेच्या मिरासाहेब दर्ग्याचे खादीम अजगर शरीकमसलत यांनी पोलीस निरीक्षक झाडे यांच्याशी संवाद साधताना दर्ग्यामध्ये मिरजेच्या कृष्णाघाटावरून नदीचे पाणी आणले जाते याबद्दल काही किस्सा सांगितला, वर्षातून आठ दिवस हे पाणी आणले जाते, पाणी आणत असताना कोणाशीही कसलेही भाष्य केले जात नाही , एकदम मौनावस्था धारण करून हे पाणी आणलं जातं. असेही खादीम अजगर शरीकमसलत यांनी सांगितले.

 

Previous Post

मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार…

Next Post

शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर मोक्का लावा , जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर मोक्का लावा , जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा…

शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर मोक्का लावा , जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group