Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आमदारांची विनंतीही धुडकावली: आगार प्रमुखाची मनमानी, कॉलेजला जाण्यासाठी वेळेवर एसटी नाही ; मुलांचा ट्रॅक्टरने प्रवास.

Admin by Admin
October 10, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
0
आमदारांची विनंतीही धुडकावली: आगार प्रमुखाची मनमानी, कॉलेजला जाण्यासाठी वेळेवर एसटी नाही ; मुलांचा ट्रॅक्टरने प्रवास.

 

कवठेमंकाळ खबऱ्या प्रतिनिधी/कवठेमहांकाळ येथे कॉलेजला जाण्यासाठी एसटी बस वेळेत नसल्याने पास काढूनही ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून जाण्याची वेळ मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील विद्यार्थ्यांवर आली आहे.

सकाळच्या वेळेत एसटीची फेरी सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी करुनही आगारप्रमुखांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. सकाळी कॉलेजच्या वेळेत फेरी सुरु न केल्यास गावामध्ये एसटी रोखून धरणार असल्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

मळणगाव येथील सुमारे १५० पेक्षाही जास्त विद्यार्थी व विद्यार्थींनी उच्च शिक्षणासाठी कवठेमहांकाळ येथे जात असतात. विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेली बस फेरी कोरोना काळात बंद झाली होती. महाविद्यालये पुर्ववत सुरु होताच ब-याच फे-या सुरळीत सुरु झाल्या. पण सकाळी येणारी बस अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी कॉलेजला जाण्यासाठी एसटी वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत आहेत. परिणामी दररोज सकाळी विद्यार्थ्यांना शिरढोण पर्यंत पायपीट करावी लागते. याबाबत ग्रामपंचायतीने पत्र देऊन सकाळची फेरी सुरु करण्याची मागणी आगार प्रमुखांकडे केली आहे. या पत्रास आगार प्रमुखांनी केराची टोपली दाखवली आहे. सोमवारी विद्यार्थ्यांवर कवठेमहांकाळला जाणा-या ट्रॅक्टरमधून जाण्याची वेळ आली.

🛑 आमदारांची विनंतीही धुडकावली

मळणगाव येथील विद्यार्थ्यांसाठी सकाळची फेरी सुरु करण्याची विनंती आमदार सुमन पाटील यांनी आगार प्रमुख महेश जाधव यांना केली होती. तरीही फेरी सुरु करण्यात आलेली नाही. काहीतरी कारण सांगून वेळकाढूपणा केला जात आहे.

Previous Post

मोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, बाळासाहेबांचा उल्लेख… वाचा काय आहेत नावं

Next Post

सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पोटात गोळा; बदल्यांसाठी दिलेला ‘मलिदा’ पाण्यात जाण्याची धास्ती..!

सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014