• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Big Breaking : मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच अब्दुल सत्तारांची थेट शिवीगाळ?

Admin by Admin
October 10, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
Big Breaking : मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच अब्दुल सत्तारांची थेट शिवीगाळ?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या ऑनलाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला १०० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेतला जात होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी सत्तारांनी खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे कामाचा आढावा नव्हे तर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर पुढील रणनीति ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत ही बाचाबाची झाली असल्याची माहिती आहे. शिविगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

…अन् सत्तार भडकले आणि शिविगाळ केली !

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आली होती. या बैठकीला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत कामकाजाचा आढावाही घेत होते. यावेळी बैठकीला उपस्थित असलेले अब्दुल सत्तार हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांना शिविगाळ केली.

…म्हणून झाला वाद..

या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील कामांची यादी देऊनही ती पूर्ण न झाल्यानं ते संतापले होते. विकासकामांचा आढावा घेताना रखडलेल्या कामामुळे सत्तार भडकले होते. यात मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवासोबत त्यांची खडाजंगी झाली. हा विषय नंतर सोडवता येईल असं सांगत इतर आमदार, मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु रागात ते बैठकीतून निघून गेले. घडलेल्या या प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तारांच्या वागणुकीवर नाराज झाल्याचं पुढे येत आहे.

Previous Post

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Next Post

मोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, बाळासाहेबांचा उल्लेख… वाचा काय आहेत नावं

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, बाळासाहेबांचा उल्लेख… वाचा काय आहेत नावं

मोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, बाळासाहेबांचा उल्लेख... वाचा काय आहेत नावं

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group