• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Admin by Admin
October 10, 2022
in राजकीय
1 min read
0
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Mulayam Singh Yadav Demise : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.

82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. आयसीयूमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते जीवनरक्षक औषधांवर होते. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मोठ्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात होते. मुलायमसिंह यादव यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली होती. प्रकृती खालावली असल्याने त्यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रुग्णालयात उपस्थित आहेत होते.

मुलायम सिंह यादव यांचा परिचय

मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ति देवी आणि सुघर सिंह यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. मुलायम सिंह हे रतन सिंह यांच्यापेक्षा लहान आहेत आणि त्यांच्या पाच भावंडांपैकी अभयराम सिंह, शिवपाल सिंह यादव, राम गोपाल सिंह यादव आणि कमला देवी यांच्यापेक्षा ते मोठे आहेत. ते ‘धरतीपुत्र’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत. 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. गेल्या काही वर्षांत देशात जेव्हा जेव्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा होते तेव्हा मुलायमसिंह यादव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पेशाने शिक्षक असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रानेही राजकीय दरवाजे उघडले.

1992 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 5 डिसेंबर 1989 ते 24 जानेवारी 1991, 5 डिसेंबर 1993 ते 3 जून 1996 आणि 29 ऑगस्ट 2003 ते 11 मे 2007 या तीन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात.

मुलायम सिंह यांचा केंद्रीय राजकारणात प्रवेश 1996 मध्ये झाला, जेव्हा काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने सरकार स्थापन केले. एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले, पण हे सरकारही फार काळ टिकले नाही आणि तीन वर्षांत भारताला दोन पंतप्रधान दिल्यानंतर ते सत्तेतून बाहेर पडले. भारतीय जनता पार्टी’ सोबतच्या त्यांच्या वैरावरून ते काँग्रेसच्या जवळ असतील असे वाटत होते, पण 1999 मध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन न देता सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. 2002 च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने 391 जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर 1996 च्या निवडणुकीत केवळ 281 जागा लढवल्या होत्या.

Previous Post

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरता आयोगाकडून गोठवलं.

Next Post

Big Breaking : मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच अब्दुल सत्तारांची थेट शिवीगाळ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Big Breaking : मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच अब्दुल सत्तारांची थेट शिवीगाळ?

Big Breaking : मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच अब्दुल सत्तारांची थेट शिवीगाळ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group