• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरता आयोगाकडून गोठवलं.

Admin by Admin
October 8, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरता आयोगाकडून गोठवलं.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवले गेले आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह पोट निवडणुकी साठी वापरता येणार नाही, असा
निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. तर शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही, नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे, असा निर्णय आयोगाकडून देण्यात आला आहे.

अंधेरी निवडणुकीत ठाकरे गट आधि शिंदे गट अशा नावाने निवडणूक लढवावी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, आम्हाला याचं मोठं दु:ख झालं आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. शिवसैनिकांसाठी हे फारच क्लेषदायक आहे. मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी हे धोकादायक आहे. गद्दारांचं हे पाप कधीही धुतलं जाणार नाही. बाळासाहेबांनी कष्टाने उभा केलेल्या शिवसेनेची अवस्था ही गद्दारांनी केली आहे, असं खैरे म्हणाले.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, आता या अंतरीम निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात अपील करु शकतील मात्र आता तेवढा वेळ नाही.

कारण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत 13 तारखेचा आहे. त्यामुळं त्याआधी त्या आदेशाला स्थगिती मिळवावी लागेल. सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली तरच शिवसेनेला हे चिन्ह मिळू शकेल, असं देशपांडे म्हणाले.

आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

Previous Post

तासगाव मध्ये शिवसेना शहर प्रमुखासह दोन मुलांवर चाकू , लोखंडी रोडने प्राणघातक हल्ला, पैशाच्या वादातून कृत्य.

Next Post

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group