• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगाव मध्ये शिवसेना शहर प्रमुखासह दोन मुलांवर चाकू , लोखंडी रोडने प्राणघातक हल्ला, पैशाच्या वादातून कृत्य.

Admin by Admin
October 7, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरज तालुक्यात पुन्हा सावकारी फोफावली : व्याजबट्टा प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगांव: खबऱ्या प्रतिनिधी/ येथील शहर शिवसेना प्रमुखासह त्यांच्या दोन मुलांसह चौघांवर प्राणघातक खुनी हल्ला झाला आहे.

पैशाच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडला. हल्ल्यात चाकू, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या शहर प्रमुखावर असा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रमोद सावंत, रोहित सावंत, प्रमोद दरेकर, प्रदीप दरेकर यांच्यासह दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवसेना शहर प्रमुख असलेले संजय चव्हाण यांनी प्रमोद सावंतकडे उसने दिलेले पैसे मागितले. यावेळी सावंतने चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सावंत याला जाब विचारण्यासाठी चव्हाण यांची मुले अभिषेक व पवन हे त्याठिकाणी आले. यावेळी वादावादीस सुरुवात झाली. हा वाद मिटवण्यासाठी चव्हाण हे पुढे आले. यावेळी प्रमोद सावंतने चव्हाण यांना उद्देशून ‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच आहेत, तुला दाखवतोच, आज तुम्हाला जिवंत ठेवत नाही’, अशी धमकी दिली.

याचवेळी प्रमोद सावंतसोबत आलेल्या रोहित सावंतने संजय चव्हाण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार केला. चव्हाण यांनी तो वार वाचवला. त्यानंतर रोहित याने केलेला वार चव्हाण यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला लागला. याचवेळी प्रदीप दरेकरने लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या डोक्यात मारले. यावेळी चव्हाण यांना वाचवण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा अभिषेक यालाही प्रमोद दरेकर व अन्य एका अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारले

चव्हाण यांचा दुसरा मुलगा पवन यालाही अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारले. तसेच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या किरण साळुंखे यांना प्रमोद सावंतने डाव्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

शहापुरात कामगाराचा खून , मृतदेह टाकला ओढ्यात..!

Next Post

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरता आयोगाकडून गोठवलं.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरता आयोगाकडून गोठवलं.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरता आयोगाकडून गोठवलं.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group