सांगली :- खबऱ्या प्रतिनिधी / सांगली जिल्ह्यातील शिवसेनेला आता मोठं खिंडार पडत असल्याचे दिसत आहे.शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि नूतन जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आता जिल्हा भरातील पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
शिव वाहतूक आघाडीचे जिल्हा प्रमुख तथा मिरज शिवसेनेचे शहर संघटक किरणसिंह राजपूत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा जाहीर करून शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले. यांच्यासहित शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रुक्मिणी आंबेगर यांनीही खच्चीकरण होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेतून बाहेर पडल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. केसरकरांच्या दौऱ्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
यावेळेस शिंदे गटाचे शहर प्रमुख विजयराव शिंदे, गजानन मोरे ,मुनिरा शेख, किरण कांबळे, योगेश आवळे ,शुभम साळुंखे, जब्बार मुजावर, प्रकाश जाधव, आनंद रजपूत, राकेश आवळे, मुस्तकीम अत्तर इत्यादी उपस्थित होते.

