• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावात बापाकडून चिमुकल्या बालकाचा निर्घृण खून

Admin by Admin
September 21, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कडेगावात बापाकडून चिमुकल्या बालकाचा निर्घृण खून
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव; खबऱ्या प्रतिनिधी : पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत सुरू असलेल्या भांडणात अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलाला फरशीवर आपटून रक्त बंबाळ करून निर्दयी बापानेच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

आयुष अर्जुन सावंत असे मृत चिमुकल्या मुलाचे नाव आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपी अर्जुन अनिल सावंत (रा. अंत्री बुद्रुक, ता. शिराळा, सध्या रा. शिवाजीनगर, ता. कडेगाव) याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शिवाजीनगर ता कडेगाव येथे मंगळवार (दि.20) रोजी रात्री घडली. याबाबत मुलाची आई पिंकी अर्जुन सावंत यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संशयित आरोपी अर्जुन सावंत याचा शिवाजीनगर येथील पिंकी सावंत हिच्याशी 2016 मध्ये विवाह झाला होता. सध्या अर्जुन हा शिवाजीनगर येथे राहत होता. अर्जुन याला दारूचे व्यसन असून तो वारंवार आपली पत्नी पिंकी हीच्या चरित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडत होता. दरम्यान मंगळवारी (दि. 20) रोजी सायंकाळी पिंकी या कामावरून घरी आल्यानंतर अर्जुन व त्याची मुले घरी होते. अर्जुनला घरी पाहत पिंकीने कामावर का गेला नाहीस असे विचारले. यावेळी अर्जुन रागाने घरा बाहेर गेला व त्यांनतर काही काळाने दारू पिऊन घरी आला आणि पिंकी सोबत भांडायला लागला. तू चांगली नाहीस असे पिंकीला म्हणून शिवीगाळ करू लागला. तर पिंकी जवळ असलेला आयुषला अर्जुनने हिसकावून आपल्या जवळ घेतले.

दरम्यान हा भांडणाचा आवाज ऐकत पिंकी याचा भाऊ व भावजय धावत घरी आले. त्यांनी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु दारूच्या नशेत असलेला अर्जुनने कोणाची काही ऐकले नाही व आपल्याच मुलाला फरशीवर आपटून रक्त बंबळ केले. त्यानंतर घरच्या लोकांनी आयुषला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Previous Post

पोलिसांसमोरच विष प्राशन करून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न : टाकळीतील घटना

Next Post

बेळगांव गेट झोपडपट्टीतील नागरिकांना फक्त आश्वासनांची खैरात..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेळगांव गेट झोपडपट्टीतील नागरिकांना फक्त आश्वासनांची खैरात..?

बेळगांव गेट झोपडपट्टीतील नागरिकांना फक्त आश्वासनांची खैरात..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group