• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलिसांसमोरच विष प्राशन करून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न : टाकळीतील घटना

Admin by Admin
September 21, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलिसांसमोरच विष प्राशन करून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न : टाकळीतील घटना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / तालुक्यातील टाकळी (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस चौकशीसाठी गेल्यानंतर अपहृत मुलीच्या मैत्रिणीने पोलिसांसमोरच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने पोलीस वाहनातून तरुणीस मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मिरज पूर्व भागातील बेडग येथील बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला मंगळवारी मध्यरात्री एका विवाहित तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, ग्रामीण पोलिसांत मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी संबंधित मुलीच्या मैत्रिणी व नातेवाइकांकडे चौकशी केली असता मुलगी सापडली नाही.

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यासाठी संबंधित मुलीसोबत महाविद्यालयात शिकणाऱ्या मैत्रिणीने मदत केल्याचा संशय असल्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रणदिवे, हवालदार संभाजी पवार, महिला पोलीस कर्मचारी शबाना शेख यांचे पथक मंगळवारी सायंकाळी टाकळीत मैत्रिणीकडे चौकशीसाठी गेले होते. यावेळी या मुलीने पोलिसांसमोरच घरातील कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तरुणीला पोलीस वाहनातून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलीच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.

Previous Post

शिंदेंचे नाव ,भाजपचा डाव..!

Next Post

कडेगावात बापाकडून चिमुकल्या बालकाचा निर्घृण खून

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगावात बापाकडून चिमुकल्या बालकाचा निर्घृण खून

कडेगावात बापाकडून चिमुकल्या बालकाचा निर्घृण खून

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group