• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

रुग्णालयात सुरू होते उपचार, वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Admin by Admin
September 17, 2022
in राजकीय
1 min read
0
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना नाशिकच्या सुयश खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
करण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

नंदुरबार जिल्ह्यातून सलग नऊ वेळा काँग्रेसकडून माणिकराव गावित खासदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता.

पहिली सभा नंदुरबारला

नंदुरबार हा आदिवासी पट्टा काँग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी या नंदुरबारमधून करत. सोनिया गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा
त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबार मध्येच झाली होती. याच मतदारसंघाचे कित्येक वर्षे गावित यांनी प्रतिनिधित्व केले होते.

राजकारणाचा श्रीगणेशा..

1965 मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या माणिकराव गावितांना केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ही पदे भूषविली
होती. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले. 1981 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी 2014 पर्यंत पराभव पाहिला नव्हता.

शिक्षण केवळ दहावीपर्यंत..

2014 मध्ये सोळाव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हाही काँग्रेसच्या
पहिल्याच यादीत माणिकराव गावित यांचे नाव जाहीर झाले होते. केवळ दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते.

Previous Post

कापुसखेडचा लाचखोर तलाठी ,बदनाम झाला १५ हजारांसाठी..!

Next Post

सांगलीची महिला पोलीस अधिकारी थायलंड मध्ये ‘मिसेस इंडिया ‘ स्पर्धेची होणार विनर…! Mrs India competition:

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीची महिला पोलीस अधिकारी थायलंड मध्ये ‘मिसेस इंडिया ‘ स्पर्धेची होणार विनर…! Mrs India competition:

सांगलीची महिला पोलीस अधिकारी थायलंड मध्ये 'मिसेस इंडिया ' स्पर्धेची होणार विनर...! Mrs India competition:

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group