• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | पोलिसांनी शोधला वृद्धाचा खुनी अन मूळ कारण..! दारूच्या नशेत शिवीगाळ ; म्हणून आले मरण..!!

Admin by Admin
September 16, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | पोलिसांनी शोधला वृद्धाचा खुनी अन मूळ कारण..! दारूच्या नशेत शिवीगाळ ; म्हणून आले मरण..!!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /

कोणत्याही कारणाशिवाय गुन्हा घडत नाही, त्याला किरकोळ वादही पुरेसा असतो. काहीच पुरावा किंवा कोणत्याही प्रकारचा वस्तूंचा ,हत्यारांचा गुन्ह्यात सहभाग नसताना केवळ कौशल्य आणि स्मार्ट पोलिसिंगच्या जोरावर किचकट गुन्ह्याचा छडा लावण्यात कासेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे. अत्यंत गुंतागूंत व आव्हानात्मक बनलेल्या कासेगाव (ता. वाळवा) येथील मज्जीद युसूफ आत्तार (वय 60) या वृद्धाचा खुनाचा छडा लावण्यात कासेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी यश मिळाले.

याप्रकरणी हणमंत राजाराम पाटील (वय 44, रा. शेणे, ता. वाळवा) याला अटक करण्यात आली आहे.

दोन महिन्यापूर्वी आत्तार यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. आत्तार यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने त्यांचा खून केल्याची कबुली संशयित पाटील याने दिली आहे. त्याला पुढील तपासासाठी कासेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दि. 21 जुलै 2022 रोजी कासेगाव-वाटेगाव रस्त्यावर राजारामबापू साखर कारखान्याच्या गट कार्यालयासमोर आत्तार यांचा खून करण्यात आला होता. दुसर्‍यादिवशी हा प्रकार उघडकीस आला होता.

कासेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल पंधरा दिवस कसून तपास केला. मात्र काहीच धागेदोरे हाती लागले नव्हते. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी या खुनाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाला गुरुवारी आत्तार यांचा खून त्यांचा मित्र हणमंत पाटील याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आत्तार यांचा खून केल्याची कबुली देत पथकासमोर थेट लोटांगणच घातले.

मृत आत्तार व पाटील यांची चांगली ओळख होती. घटनेदिवशी त्यांची भेट झाली. आत्तार यांनी दारूचे सेवन केले होते. नशेत त्यांनी आई व बहिणीवरून पाटीलला खूप शिवीगाळ केली. ते नशेत असल्याने पाटील यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री त्यांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी पाटील याने आत्तारला ‘मला दुपारी का शिवीगाळ केलीस’, असा जाब विचारला. यातून दोघांत कडाक्याचे भांडण सुरू झाली. तेंव्हाही आत्तार यांनी पाटीलला शिवीगाळ केली. दुपारी तसेच आताही शिवीगाळ केल्याने पाटीलला राग आला. त्याने आत्तार यांना खाली पाडून सिमेंट काँक्रीटच्या दगडाने त्यांचे डोके ठेचले. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव होऊन आत्तार यांचा मृत्यू झाला होता.

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, कासेगाव ठाण्याचे अविनाश मते, उपनिरीक्षक विशाल येळेकर, संदीप गुरव, संदीप नलवडे, सुनील चौधरी, दीपक घस्ते, जितेंद्र जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक यांचं निलंबन ; पोलीस अधिक्षकांची माहिती

Next Post

स्थायी समिती सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीवर काँग्रेस पक्षाचा संशय : आरोपांच्या भूमिकेने वादाची ठिणगी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
स्थायी समिती सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीवर काँग्रेस पक्षाचा संशय : आरोपांच्या भूमिकेने वादाची ठिणगी

स्थायी समिती सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीवर काँग्रेस पक्षाचा संशय : आरोपांच्या भूमिकेने वादाची ठिणगी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group