Sunday, June 8, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक यांचं निलंबन ; पोलीस अधिक्षकांची माहिती

Admin by Admin
September 15, 2022
in क्राईम
0
अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक यांचं निलंबन ; पोलीस अधिक्षकांची माहिती

जळगाव,(खबऱ्या प्रतिनिधी)- एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी निलंबन केले आहे. तसेच बकाले यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिनांक १४ रोजी माध्यमांना दिली आहे.

पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी काढलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की,पोलीस निरीक्षक, किरणकुमार भगवानराव बकाले, हे दिनांक 01.11.2020 पासून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे नेमणूकीस असतांना, त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणूकीचे एका पोलीस अंमलदारासोबत विशिष्ट समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदणीय व विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची मोबाईलवरील संभाषणाची ऑडीओ क्लीप व्हायरल झालेली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतांना. उच्च नैतिक मुल्ये बाळगुन. लोकांप्रती सौजन्य आणि सहवर्तन ठेवणे अपेक्षीत होते. असे असतांनाही त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर केला आहे.

व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपमधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जावून, पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदारपणाच्या गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर संभाषण असलेला पेन ड्राईव्ह यासोबत जोडला आहे.

तरी श्री. किरणकुमार भगवानराव बकाले, नेमणूक स्था. गु. शा. जळगाव यांच्या सदर अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व गैरशिस्त वर्तनाची सखोल प्राथमिक चौकशी करून कसूरीचे अनुषंगाने आवश्यक जाबजबाब व दस्तऐवजी पुरावे जमा करावेत व त्याबाबतचा अहवाल आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह दिनांक 22.09.2022 पावेतो पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे मार्फतीने या कार्यालयास सादर करावा असे नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

साधूंच्या मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा संशयितांना अटक…

Next Post

सांगली | पोलिसांनी शोधला वृद्धाचा खुनी अन मूळ कारण..! दारूच्या नशेत शिवीगाळ ; म्हणून आले मरण..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | पोलिसांनी शोधला वृद्धाचा खुनी अन मूळ कारण..! दारूच्या नशेत शिवीगाळ ; म्हणून आले मरण..!!

सांगली | पोलिसांनी शोधला वृद्धाचा खुनी अन मूळ कारण..! दारूच्या नशेत शिवीगाळ ; म्हणून आले मरण..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014