• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

डीवायएसपी धीरज पाटील यांची फेरसाक्ष होणार

Admin by Admin
September 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
डीवायएसपी धीरज पाटील यांची फेरसाक्ष होणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : अनिकेत कोथळे खून प्रकरणातील तपास अधिकारी व तत्कालीन जिल्हा पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांचा उलट तपास आज अपूर्ण राहिला. सरकार पक्षाच्यावतीने त्यांची फेरसाक्ष घेण्याची मागणी करण्यात आली.

त्यामुळे आजची सुनावणी तहकूब ठेवण्यात आली. पुढील सुनावणी दि. 26 सप्टेंबररोजी होणार आहे.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व त्यांना सहायक म्हणून जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. गिरीष तपकिरे, अ‍ॅड. प्रमोद सुतार, अ‍ॅड. विकास पाटील यांनी काम पाहिले. सीआयडीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी व विद्यमान उपअधीक्षक आयेशा लांडगे सरकार पक्षाला मदत करीत आहेत. अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या समोर सुरू आहे. सोमवारी धीरज पाटील यांची मुख्य साक्ष झाली. बचाव पक्षातर्फे त्यांचा उलट तपास घेण्यात आला. हवालदार अनिल लाड यांच्या चौकशीतून खुनाचा उलगडा झाला असल्याची साक्ष धीरज पाटील यांनी दिली होती.

धीरज पाटील यांची मुख्य साक्ष खोटी ठरवण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने केला. धीरज पाटील यांची फेरसाक्ष घेण्याची विनंती सायंकाळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब ठेवून पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी घेण्याची सूचना न्यायालयाने केली.

Previous Post

बिलावर ‘ईडी’..! शिंदे -फडणवीसांची चमकोगिरी , पर्यावरणाच्या नावाखाली निवडणूक प्रचार..?

Next Post

साधूंच्या मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा संशयितांना अटक…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
साधूंच्या मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा संशयितांना अटक…

साधूंच्या मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, सहा संशयितांना अटक...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group