• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिलावर ‘ईडी’..! शिंदे -फडणवीसांची चमकोगिरी , पर्यावरणाच्या नावाखाली निवडणूक प्रचार..?

Admin by Admin
September 14, 2022
in राजकीय
1 min read
0
बिलावर ‘ईडी’..! शिंदे -फडणवीसांची चमकोगिरी , पर्यावरणाच्या नावाखाली निवडणूक प्रचार..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या राज्यातल्या नव्या सरकारने केंद्राचा कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे. कोविड लसीकरण प्रमाणपत्र व गॅस सिलिंडरवर पंतप्रधान मोंदींचे फोटो छापून आल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बेस्टच्या विजेच्या बिलावर स्वत:चे फोटो छापून आणले आहेत.

बेस्टच्या बिलांचा वापर मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘ईडी’ सरकारचे (एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस) फोटो प्रसिद्ध करण्यास सुरुवात केल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो प्रसिद्ध झाले होते. कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील नरेंद्र मोदींच्या फोटोवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. या फोटोच्या विरोधात केरळ हायकोर्टात याचिकाही दाखल झाली होती. त्यानंतर अलीकडच्या काळात गॅस सिलिंडरवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले होते. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती हजारांच्या पार गेल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे. महागाईच्या विरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना गॅस सिलिंडरवर मोदींचा हसरा चेहरा लावण्यात आला होता. यामुळे महागाईने पोळलेल्या देशातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.

तशीच परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईतही महागाई उच्चांक गाठत आहे. विजेचे दर वाढत आहेत. सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळून निघाला असताना आता बेस्टच्या विजेच्या बिलांवर पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या नावाखाली ईडी सरकारचे फोटो छापले आहेत. माहीममधील ज्येष्ठ शिवसैनिक सुबोध महाले यांनी या फोटोंवर आक्षेप घेतला आहे. बेस्टच्या विजेच्या बिलांवर आतापर्यंत कधीही अशा प्रकारे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले नाहीत, मग आताच असे फोटो छापण्याचे उद्दिष्ट काय? मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निवडणूक प्रचाराचा प्रकार असल्याचा संशय सुबोध महाले यांनी व्यक्त केला.

Previous Post

कबनुर ग्रामपंचायत सदस्यांकडून सफाई कामगारांस अर्वाच्च शिवीगाळ ,बघून घेण्याची धमकी..!

Next Post

डीवायएसपी धीरज पाटील यांची फेरसाक्ष होणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
डीवायएसपी धीरज पाटील यांची फेरसाक्ष होणार

डीवायएसपी धीरज पाटील यांची फेरसाक्ष होणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group