• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी सोडवा – मिरज शहर सुधार समितीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.

Admin by Admin
March 26, 2022
in सामाजिक, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी सोडवा – मिरज शहर सुधार समितीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज खबऱ्या प्रतिनिधी / शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून रस्त्यावरील अतिक्रमणे व विजेचे खांब स्थलांतरित करण्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम रखडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या रस्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर करून रस्ता जलदगतीने होण्यासाठी मिरज शहर सुधार समितीने थेट केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सांगली येथे भेटून साकडे घातले.

शनिवारी केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, भाजपचे जेष्ठ नेते मकरंद देशपांडे यांच्या समवेत मिरज शहर सुधार समिती अध्यक्ष शंकर परदेशी, जहीर मुजावर, रामलिंग गुगरी, असिफ निपाणीकर, मन्सूर शेख आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सुमारे 11 किमी रस्त्यासाठी केंंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे 27 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 24 कोटींची निविदा मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.

रस्ता रूंदीकरण, अतिक्रमण हटविणे आणि विद्युत खांब स्थलांतरित करणे आदी कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि महावितरण कंपनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे अत्यंत संथगतीने सुरू असलेले काम रखडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे म्हणजे २२किलोमीटर रस्ता होण्यासाठी कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी सुधार समितीने केंद्रिय मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे.

Previous Post

पत्रकार भवनच्या उभारणीत शंकरराव कोल्हे यांचा सिंहाचा वाटा

Next Post

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group