• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पत्रकार भवनच्या उभारणीत शंकरराव कोल्हे यांचा सिंहाचा वाटा

Admin by Admin
March 26, 2022
in सामाजिक
1 min read
0
पत्रकार भवनच्या उभारणीत शंकरराव कोल्हे यांचा सिंहाचा वाटा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : दिव़ंगत माजी मंत्री व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते कै. शंकरराव कोल्हे यांचे पुण्यातील पत्रकार भवनाच्या इमारतीसाठी सरकारी जागा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे. कोल्हे यांच्या आग्रहामुळेच या इमारतीसाठी सहा हजार चौरस फूट जागा मिळाली आणि सध्याचे भव्यदिव्य पत्रकार भवन साकारू शकले, अशा विविध आठवणींना उजाळा देत, दिवंगत कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने शनिवारी (ता.२६) श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या श्रद्धांजली सभेत बोलताना पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे, प्रतिष्ठानचे कार्यवाह गजेंद्र बडे, प्रतिष्ठानचे खजिनदार प्रकाश भोईटे, प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष उमेश घोंगडे आदी उपस्थित होते.

पुण्यातील पत्रकार भवनासाठी पत्रकारांनी राज्य सरकारनकडे तीन हजार चौरस फूट जागेचीच मागणी केली होती. तेव्हा शंकरराव कोल्हे हे महसूलमंत्री होती. त्यामुळे त्यावेळी कोल्हे यांनी तीन हजार चौरस फुटांऐवजी आग्रह करत आणि त्यामागील भूमिका स्पष्ट करत सहा हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिल्याची आठवण पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष राजीव साबडे यांनी सांगितली.

या श्रद्धांजली सभेत साबडे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, चंद्रकांत दिक्षीत, जयराम देसाई, सुनील माळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Previous Post

सांगलीमध्ये नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा, म्हणाले…..

Next Post

मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी सोडवा – मिरज शहर सुधार समितीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी सोडवा – मिरज शहर सुधार समितीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.

मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी सोडवा - मिरज शहर सुधार समितीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group